Type 1 Marathi – मधुमेह काय आहे?

मधुमेह म्हणजे आपल्या रक्तामध्ये अतिशय जास्त प्रमाणात साखर आहे. जेव्हा आपले शरीर पुरेशा प्रमाणात इंसुलिन नावाच्या रसायन किंवा संप्रेरकाची निर्मिती करीत नाही तेव्हा रक्तातील साखरेची समस्या सुरू होते. आपले शरीर आपण खाणाऱ्या बहुतांश अन्नाला एका प्रकारच्या साखरेमध्ये रूपांतरीत करते ज्याला ग्लुकोज म्हणतात. ही साखर आपल्या रक्तामधून आपल्या शरीरातील सर्व पेशींपर्यंत पोहोचते. आपल्या ऊर्जा देण्याकरीता आपल्या पेशींना साखरेची गरज भासते. आपल्या रक्तातून आपल्या पेशीमध्ये जाण्याकरीता इंसुलिन साखरेला मदत करते. इंसुलिन शिवाय आपल्याला ऊर्जावान राखण्याकरीता आपल्या पेशींना साखर मिळत नाही. आपल्या रक्तातून आपल्या शरीराच्या पेशींमध्ये साखरेला हलवून इंसुलिन रक्तातील साखरेची पातळी सामान्य (खूप जास्तही नाही व खूप कमीही नाही) राहण्यास मदत करते. रक्तातील इंसुलिनची उच्च पातळी कमी करण्याकरीता जेव्हा आपल्याजवळ पुरेसे इंसुलिन नसते त्याचा अर्थ आपल्याला मधुमेह असतो. रक्तातील साखरेच्या उच्च पातळीमुळे आरोग्याच्या गंभीर समस्या उत्पन्न होऊ शकतात. त्यामुळे मधुमेहावर अवश्य उपचार केला जावा.

Type 1 Marathi – आपल्याला मधुमेह केव्हा असतो?

आपले शरीर मुळीच इंसुलिन बनवत नसेल. आपले शरीर पुरेशा प्रमाणात इंसुलिन बनवत नसेल किंवा शरीराद्वारे बनवले जाणारे इंसुलिन योग्य प्रकारे कार्य करीत नसेल. आपल्या रक्तातून आपल्या पेशींमध्ये साखर हलवण्याकरीता जर पुरेसे इंसुलिन नसेल तर रक्तातील साखरेची पातळी वाढलेली राहते.

Type 1 Marathi – प्रकार १ मधुमेह

या प्रकार १ मधुमेहामध्ये शरीर इंसुलिनची निर्मिती करीत नाही. प्रकार १ मधुमेह बहुधा प्रौढांच्या तुलनेत मुलांमध्ये आणि तरूणांमध्ये जास्त उद्भवतो. प्रकार १ मधुमेहाने ग्रस्त लोकांनी रक्तातील साखरेचे नियंत्रण करण्याकरीता इंसुलिनचे इंजेक्शन घेणे आवश्यकच आहे.

Type 1 Marathi – प्रकार 1 मधुमेहाची लक्षणे

  • अतिशय तहान लागणे
  • वारंवार लघवीला लागणे
  • फळासारखा गंध येणे
  • थकव्याचा अशक्तपणा
  • लघवीमध्ये साखर जाणे
  • वजन जास्त प्रमाणात कमी होणे

Type 1 Marathi – मधुमेहाच्या गुंतागुंती

इंसुलिन हे संप्रेरक रक्तप्रवाहामधून शरीराच्या पेशींमध्ये ग्लुकोज (आपण खाललेल्या अन्नामधून निर्माण केले जाते) वाहून नेण्याकरीता आवश्यक आहे, जेथे ग्लुकोजला ऊर्जा म्हणून वापरण्यात येते. जेव्हा इंसुलिन पुरेशा प्रमाणात असत नाही तेव्हा रक्तामध्ये ग्लुकोजचे प्रमाण वाढत जाते ज्यामुळे लोकांना आरोग्याच्या गंभीर समस्यांचा धोका उत्पन्न होतो, जसे की:

  • हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक
  • मूत्रपिंडाच्या समस्या
  • पायामध्ये बधिरता आणि बऱ्या न होणाऱ्या जखमा
  • दृष्टीच्या समस्या
रक्तातील ग्लुकोजची पातळी शक्य तेवढी सामान्य ठेवून आपण मधुमेहाच्या दीर्घकालीन गुंतागुंती टाळू शकता किंवा लांबवू शकता.