New to Insulin Marathi – मला इंसुलिनची गरज का आहे?

रक्तातील ग्लुकोजच्या पातळीचे नियमन करण्याकरीता या संप्रेरकाची निर्मिती केली जाते. इंसुलिनच्या अनुपस्थितीमध्ये आपल्या शरीराच्या पेशी ग्लुकोजचा वापर ऊर्जेच्या स्वरूपात करू शकत नाही. आपल्याला मधुमेह असल्यावर आपले शरीर इंसुलिन बनवत नाही किंवा बनलेले इंसुलिन योग्य प्रकारे कार्य करीत नाही. त्यामुळे आपल्याला अतिरिक्त इंसुलिनची गरज भासते. आपल्याला आवश्यक असणारे इंसुलिन आपण इंसुलिन पेन, सिरिंज किंवा इंसुलिन पंप द्वारे टोचून मिळवू शकता. इंसुलिन घेतल्याने: आपल्याला साखरेची पातळी नियंत्रण राखण्यास मदत मिळते आपल्याला ऊर्जा मिळते आपल्याला निरोगी राहण्यास मदत मिळते

New to Insulin Marathi – शरीरामध्ये इंसुलिनचे स्त्रवण

उपवासाच्या स्थितीमध्ये स्त्रवण होणाऱ्या इंसुलिनला मूलभूत म्हणजेच बेसल इंसुलिन म्हटले जाते. अन्नपदार्थ खाल्यानंतर रक्तातील ग्लुकोजची मात्रा वाढल्याने त्याला प्रतिसाद म्हणून इंसुलिनचा स्त्राव वाढतो. मधुमेहामध्ये ही प्रक्रिया प्रभावित होते ज्याकरीता बाहेरून इंसुलिन टोचणे आवश्यक असते.