GDM Marathi – गर्भधारणेचा मधुमेह म्हणजे काय?

  • गर्भधारणेच्या कालावधी दरम्यान विकसित झालेला मधुमेह म्हणजे गर्भधारणेचा मधुमेह आहे.
  • गरोदरपणामध्ये आपली अतिरिक्त गरज भागवण्याकरीता आपले शरीर पुरेसे इंसुलिन (रक्तातील ग्लुकोजचे नियंत्रण करण्याकरीता महत्वाचे असलेले संप्रेरक) उत्पन्न करू शकत नाही व त्यामुळे हा विकार उद्भवतो. याचा परिणाम रक्तातील ग्लुकोजची पातळी उंचावण्यात होतो.
  • सामान्यपणे गर्भधारणेचा मधुमेह गरोदरपणाच्या कालावधी मध्ये किंवा शेवटी सुरू होतो.

GDM Marathi – गर्भधारणेचा मधुमेह किती सामान्य आहे?

  • गर्भधारणेचा मधुमेह ही खूपच सामान्य बाब आहे.
  • हा कदाचित 100 पैकी 18 स्त्रियांना गरोदरपणामध्ये प्रभावित करू शकतो.

GDM Marathi – वजन वाढणे

  • चांगल्या प्रकारे नियंत्रित रक्तातील साखरेसोबतचे वजन, आपले वजन आणि गरोदरपणामध्ये वाढलेले वजन यांचा आपल्या गर्भाच्या वजनावर मोठा प्रभाव पडतो.
  • आपले BMI किती जास्त आहे आणि गर्भधारणेमध्ये आपले किती जास्त वजन वाढते, तेवढ्याच जास्त प्रमाणात आपल्या गर्भाचेही वजन वाढेल. त्यामुळे, गर्भ जन्माच्या आधीच जास्त वजनाचा होण्याची जोखीम आहे.
  • गर्भधारणेच्या पहिल्या भागात थोडे वजन वाढवण्याचे लक्ष्य ठेवावे, जेणेकरून दुसऱ्या भागात जास्त वजन वाढण्याकरीता जागा शिल्लक राहील.